नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राजधानीच्या मंगोलपुरी परिसरात बजरंग दलचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांचा निर्घृण खून करण्यात आल्यानंतर परिसरात तणाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृतक रिंकू हे सामाजिक कार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायचे. याअंतर्गत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. खूनातील प्रमुख आरोपींपैकी एका इस्लामच्या पत्नीला जेव्हा गरज होती तेव्हा रिंकू यांनीच त्यांना रक्त दिलं होतं.
दैनिक न्यूजच्या रिपोर्टनुसार, आरोपी इस्लाम याची पत्नी दीड वर्षांपूर्वी गर्भवती होती. स्वत: रिंकूच्या शेजाऱ्यांनी याबाबत सांगितलं होतं. डिलीव्हरीवेळी त्याच्या पत्नीची तब्येत खराब झाली. ज्याच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रक्ताची गरज होती. अशा वेळी रिंकूने आपलं रक्त दिलं. इतकंच नाही तर रिंकूने इस्लामच्या भावाला कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं होतं.
रिंकू हा त्याच्या घरात मोठा होता आणि तो एकटा कमावणारा होता. आजामुळे त्यांच्या वडिलांनी नोकरी सोडली होती. मंगोलपुरी येथील घरापासून थोड्याच अंतरावर ब्लॉकमध्ये दानिश उर्फ लाली, इस्लाम, मेहताब उर्फ नाटू आणि जाहिद उर्फ छिंगू राहात होते. रिंकू आणि या चौघांमध्ये दसऱ्याला राम मंदिर पार्कमधील कार्याक्रमावरुन वाद झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दानिशने नातेवाईक इस्लाम, मेहताब, जाहिद सोबत बुधवारच्या रात्री जवळपास 10.30 वाजता घराच्या समोरील गल्लीमध्ये आले. सर्वांच्या हातात शस्त्र होते आणि काठ्या होत्या. हे लोक रिंकूच्या घराबाहेर आले आणि शिवीगाळ करु लागले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर हे आरोपी घरात घुसले आणि रिंकूवर हल्ला केला. मेहताबने रिंकूवर चाकूने वार केले.
टाइम्स नाऊच्या माहितीनुसार, रिंकूची आई राधा शर्मा यांनी सांगितलं की त्यांनी माझ्या मुलाला मित्राच्या वाढदिवसाला बोलावण्यात आलं होतं. त्याची तब्येत ठीक नव्हती तरीही तो गेला. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याला ओढून घेऊन गेले आणि मग चाकूने त्याच्यावर वार केला. इतकं रक्त वाहलं की संपूर्ण गल्लीत रक्तच रक्त झालं.
चाकू रिंकूच्या पाठीच्या कण्यात अडकला. या चार आरोपींना रिंकूला वाचवायला आलेल्या मित्रावरही हल्ला केला. त्यानंतर मनु आपल्या जखमी भावाला घेऊन संजय गांधी रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी रिंकूच्या शरिरातून चाकू काढला. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.