सोलापूर (वृत्तसंस्था) – ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल हा वाद उफाळला असताना, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांशी असलेल्या संबंधांबाबत भाष्य केलं. “माझा राज्यपालांशी कायम संपर्क असतो. मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे मला काहीही अडचण येत नाही” असं उदय सामंत म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. उदय सामंत आणि राज्यपाल यांच्यात अंतिम वर्षांच्या परीक्षांवरुन मोठा वाद रंगला होता. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांचं भाष्य महत्त्वाचं आहे.
उदय सामंत म्हणाले, ” माझा राज्यपालांशी कायम संपर्क असतो. मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे मला काहीही अडचण येत नाही. राजकीय ज्या काही गोष्टी होत आहेत त्या वेगळ्या, मात्र हे खाते चालवत असताना राज्यपालांशी संपर्क येत असतो. माझा वर्षभराचा कार्यकाळ पहिला तर लक्षात येईल माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत”
राज्यपालांशी माझा कायम संपर्क असतो, राज्यपालांचा मी लाडका मंत्री आहे. त्याच्यामुळे मला कुठलीही अडचण येत नाही, असं वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.
आठ दिवसांपूर्वी मी राज्यपाल महोदयांशी चर्चा करुन आलो. अनेक विषयांवर चर्चा करुन आलो. राजकीय जे काही कार्यक्रम होत आहेत किंवा राजकीय ज्या काही गोष्टी होताएत, त्या वेगळ्या आहेत. परंतु हे खातं चालवत असताना राज्यपाल महोदयांकडे मला जावं लागतं. त्यांना भेटावं लागतं, असंही उदय सामंत यांनी पुढे बोलताना स्पष्ट केलं. कुलपती म्हणून काही कामकाजही राज्यपालांसोबत करावं लागतं, असंही सामंत पुढे म्हणाले. आपण वर्षभराचा आलेख जर बघितला तर माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत, असं सांगायलाही उदय सामंत विसरले नाहीत.