मुंबई (वृत्तसंथा) – शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी बुधवारी केला होता. यावर आता वादंग निर्माण झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, जर केंद्र सरकारच्या मंत्र्यांकडे अशी माहिती असेल तर संरक्षण मंत्र्यांनी चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.
संपूर्ण देश चिंतेत आहे की लाखो शेतकरी सिंघू बॉर्डरवर लढत आहेत. सरकारला खरंच तोडगा काढायचा असता तर निघाला असता. परंतु, बहुधा सरकारला हा विषय असाच ठेवायचा आहे, अशी शंकाही राऊतांनी व्यक्त केली.
सरकारला कायदा आणि शेतीच्या कायद्यात काही बदल हवे असतील तर भाजपशासित राज्यांमधून सुरुवात करावी. तिकडे प्रयोग करावा, काय परिमाण होतोय ते पाहता येईल आणि त्यानंतर इतर राज्ये स्वीकारतील. कदाचित पंजाबही स्वीकारेल, असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.







