यावल (प्रतिनिधी) – येथील न्यायालयाचा कर्मचारी प्रत्यक्षात न्यायालयात हजर नसताना त्याची कार्यालयात गैर हजेरी लावलेली असताना ते कार्यालयात इतरत्र हजर न सताना सुद्धा त्यांनी कार्यालयीन हजेरीपटावर खाडाखोड करून हजेरीपटावर सह्या करून कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी यावल न्यायालयाचे न्यायाधीश जगताप यांनी यावल पोलिसात आरोपी क्लार्क विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

यावल दिवाणी न्यायालयातील आरोपी विजय पंढरीनाथ सूर्यवंशी लिपिक हे 19 ऑक्टोबर 20 ते 7 नोव्हेंबर 20 या कालावधीत न्यायालयात हजर नसताना व त्यांची कार्यालयात गैरहजेरी लावलेली असताना ते कार्यालयीन वेळेत इतरत्र हजर नसताना सुद्धा त्यांनी कार्यालयातील हजेरीपटावर खाडाखोड करून हजेरीपटावर सह्या करून कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी यावल न्यायालयाचे न्यायाधीश जगताप यांनी यावल पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी या प्रकरणी भाग 5, गु .र. न . 200 / 20 भादवि कलम 420, 465, 468, 471, 167 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यावल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एस बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजमल पठाण हे करीत आहेत.







