जळगाव (प्रतिनिधी) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या गाड्यांवर प बंगाल येथे ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक केली गेली. यापूर्वी भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्यावर हल्ला करण्यात आला. शेकडो कार्यकर्त्यांना जखमी केले गेले.
यापूर्वी अनेक भाजपा कार्यकर्त्यांचे खून केले गेले आहेत. हा हल्ला, ही दगडफेक कोण्याएका व्यक्तीवर नसून ती भारताच्या लोकशाहीवर आहे. या आत्मघातकी भ्याड कृत्याचा भव्य निषेध आमदार तथा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजु मामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भा.ज.यु.मो तर्फे करण्यात आला.
यावेळी जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल जी त्रिपाठी, महेश जी जोशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटिल, सचिन जी पानपाटील , महिला आघाडी अध्यक्ष दिप्ती ताई चिरमाडे नगरसेवक राजुभाऊ मराठे तसेच युवा मोर्चा जिल्हा महानगर सरचिटणीस- अक्षय जेजुरकर,मिलिंद चौधरी , महेश पाटील, उपाध्यक्ष-सचिन बाविस्कर, विक्की सोनार, राहुल मिस्त्री, राहुल लोखंडे, रियाज शेख ,जयेश ठाकुर, चिटणीस-प्रतिक शेठ ,सागर जाधव, प्रसिध्दी प्रमुख- गौरव पाटील,कार्यालय मंत्री -भुषण पाटील,सोशल मिडिया प्रमुख-भूषण जाधव, मंडळ अध्यक्ष महेश लाठी , जयंत चव्हाण, अबोली पाटील , ओबीसी आघाडी अध्यक्ष जयेश भावसार , महिला जिल्हा सरचिटणीस रेखाताई वर्मा, सरोजताई पाठक ,शोभाताई कुलकर्णी , निलाताई चौधरी , सविताताई बोरसे , पुजाताई चौधरी , तृप्तीताई पाटील , शालूताई जाधव , जगताळे ताई , राहुल वाघ, गणेश माळी , भास्कर जुनागडे तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.