अमळनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाने राज्य मार्केटिंग फेडरेशन मार्फत मका व महाराष्ट्र राज्य कापूस फेडरेशनमार्फत कापूस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
शासनाच्या या आवाहनास प्रतिसाद देत अमळनेर वगळता जिल्हाभरात कापूस व मका खरेदी केंद्र सुरु झाली आहेत.अमळनेरचे कापूस व मका खरेदी केंद्र सुरु होईल का? अशी भुमिपुत्र शेतकरी विचारणा करित आहेत. हे केंद्र सुरु झाली नाही तर भुमिपुत्र शेतकरयांचे मोठे नुकसान होत आहे. हे केंद्र सुरु करणार नसणार तर शासनाने प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे. अश्या मागणीचे पत्र नुकतेच अमळनेर नायब तहसीलदार यांना देण्यात आले आहे. त्यावेळी अमळनेर कृ.उ.बा.समिती चे संचालक ब्राम्हने वि.का.सो.चे चेअरमन पराग पाटील,जिल्हा परिषद सदस्य अँड.व्ही.आर.पाटील भाजपा तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील उपस्थित होते.भुमिपुत्र शेतकरी बांधवांचा कापूस ,मका खरेदी करुन प्रति क्विंटल राज्यशासनाने अनुदान द्यावे अन्यथा तीव्र अंदोलन करण्यात येईल.