मुंबई (प्रतिनिधी) – गेल्या १९ वर्षांपासून जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचे सचिव संजय चव्हाण हे पार्टीचे विचार, तत्व, संकल्पना व कार्य तसेच पार्टीचे अध्यक्ष ना.शरद पवार यांचे कर्तृत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने ‘साहेब’ या दिनदर्शिकेचे शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाशन करीत असतात.
यंदा या दिनदर्शिकेचे २० वे वर्ष होते. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वयाची ८० वर्षे पूर्ण केली. त्या निमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह निवडक पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांसोबत जळगाव जिल्ह्यातून विशाल गुलाबराव देवकर, संजय चव्हाण, हेमंत पाटील, उमेश पाटील व राहुल शिंपी उपस्थित होते.