शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
पाचोरा (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी आमदार दिलीप वाघ यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राजीव गांधी टाऊन हॉल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा स्वच्छतादूत म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप वाघ यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात बजावलेल्या अतुलनीय कामगिरीचा गौरव केला आणि जनतेने आरोग्यासाठी स्वच्छतेला समर्पित असलेल्या या कर्मचाऱ्यांना समाजाने ऋण व्यक्त केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
खलील देशमुख ,नितीन तावडे यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी एम एम महाविद्यालयात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुंबई येथील कार्यक्रमाचे कार्यकर्त्यांसाठी थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर नगर परिषदेचे गटनेते संजय वाघ ,विधानसभा क्षेत्राध्यक्ष नितीन तावडे,भूषण वाघ, पाचोरा तालुका अध्यक्ष विजय पाटील, पाचोरा तालुका शहराध्यक्ष सतीश चौधरी,पाचोरा तालुका महिला अध्यक्ष सरलाताई पाटील,युवक तालुका अध्यक्ष हर्षल पाटील यांचेसह,बशीर बागवान,दत्ता बोरसे,संजय एरंडे, जगदीश सोनार,भगवान मिस्तरी,सुभाष पाटील,प्रा.भागवत महालपुरे,धनराज पाटील,डॉ प्रकाश पाटील,अशोक मोरे, भडगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव,अरुण पाटील,प्रकाश पाटील,सुभाष पाटील,सतीश देशमुख, सागर पाटील, संजय सूर्यवंशी, योगेश पाटील,रणजित पाटील, सुनील पाटील,योगेश कुमावत,शुभम नाईक,गोपी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास पाटील यांनी केले.