चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शाखा व जिल्हा जळगाव अंतर्गत येणाऱ्या तांदुळवाडी या गावी बचत गटाचे कर्ज घेतलेल्या महिलांना फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकतर्फे निःशुल्क अन्नधान्य वाटप संपन्न झाले.
ग्रामीण भागातील जनतेमधे कारोना विषाणू विषयी जनजागृति करुन त्यापासून कसे वाचावे, संक्रमण कसे टाळावे, व वैयक्तिक स्वछता कशी राखावी या नियोजनासाठी प्रेरित करणे हा फिनकेअर बँकेचा मुख्य उद्देश असून बँक त्या दिशेने वाटचाल करीत आहे. यावेळी गावातील जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी चाळीसगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर मोरे व कर्मचारी नारायण गुरव व भरत माळी उपस्थित होते.