आचारसंहितेचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई.. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर : राज्य निवडणूक आयोगाच्या आज दि.११डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येणार आहेत.
तसेच राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या २९ नोव्हेंबर च्या पत्रकानुसार ज्या तालुक्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत. त्या संपुर्ण तालुक्यात आचारसंहिता लागु राहील.
यासंदर्भात अमळनेर तालुक्यातील एकुण ११९ ग्रामपंचायतीपैकी ६७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येणार आहेत.या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील सर्व ११९ ग्रामपंचायती व त्यामध्ये समाविष्ठ गावांना आदर्श आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासुन निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहील.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहिते बाबतच्या सुचनांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे. आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधीतांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. असा इशारा अमळनेरचे तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांनी दिला आहे.







