जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयाच्या हृदयालय या विभागातर्फे नवजात शिशू ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांना असलेल्या हृदयासंबंधित आजारांसाठी शस्त्रक्रिया शिबिरात १२ बालकांवर एएसडी,व्हीएसडी,पीडीए शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
३ ते ५ जूलै रोजी शिबिराचा आज समारोप करण्यात आला.वाडीया रूग्णालय मुबंईचे इंटरव्हेशनल पेडीयाट्रीक कॉर्डीओलॉजीस्ट डॉ श्रीपाल जैन, डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील , डॉ. सुमीत शेजोळ डी एम कॉर्डीओलॉजीस्ट , एम डी बालरोग तज्ञ तथा कॉर्डीओलॉजीत फेलोशिप मिळवलेले डॉ. धवल खडके,भुलरोग तज्ञ डॉ. सतीष, डॉ. राजेश्वरी, डॉ. चेतन भोळे, डॉ. उमेश यांच्या टीमने या शस्त्रक्रिया केल्यात त्यांना निलेश तेली, बालाजी सुधाकर बिराजदार, गोल्डी सावळे, दिपाली भांबेरे व नर्सिंग स्टाफने सहकार्य केले. या शिबिरात बालकांच्या हृदयाला जन्मत: छिद्र असल्यास ही समस्या वेळीच ओळखली आणि गरजेनुसार एएसडी/व्हीएसडी किंवा पीडीए या शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांद्वारे करुन घेतल्यास त्यांचे भविष्य खुप चांगले असते. अल्प पल्स व हदयाचा दाबाची तपासणी करण्यात आली. या दुरदृष्टीनेच हृदयालयातर्फे बालकांसाठी हृदयविकार निवारण व शस्त्रक्रिया शिबिरातून १२ बालकांना दिलासा मिळाला. शस्त्रक्रियेनंतर बालरोग विभागातील डॉ अनंत बेंडाळे, डॉ उमाकांत अनेकर, डॉ सुयोग तन्नीरवार, डॉ विक्रांत देशमुख, डॉ गौरव पाटेकर, निवासी डॉ दर्शन राठी, डॉ चंदाराणी यांनी बालकांची काळजी घेतली. महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना तसेच राष्ट्रीय बालकल्याण सुरक्षा योजनेत या शस्त्रक्रिया मोफत केल्यात. या शिबिरासाठी मार्केटिंग चे रत्नशेखर जैन यांचेसह टीम ने परिश्रम घेतले.