कोल्हापूर (वृत्तसंस्था) – विजापूरहून बंगळुरुला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली. या आगीत बसमधील पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. कर्नाटकमधील केआरहल्ली गावाजवळची रात्रीची घटना. कुक्केरी श्री ट्रॅव्हल्स कंपनीची बस २९ प्रवाशांना घेऊन विजापूरहून बंगळुरुला जात होती. रात्री ९ वाजता ही बस विजापूरहून निघाली असता अचानक पेटली. दरम्यान, या आगीच कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, विजापूर-बंगळुरु मार्गावर रात्री ९ वाजण्याचा सुमारास चालत्या बसला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आगीने बसला पूर्णत: वेढल्याने बसमधील प्रवाशांचा आरडा-ओरडा ऐकू येत होता. तोपर्यंत बसने पूर्णपणे पेट घेतल्याने अनेकजण जखमी झालेत. मात्र या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.