मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आज ब्रीच कॅंडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

शरद पवार यांना पित्ताशयाच्या त्रासाने या महिन्याच्या सुरवातीला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यांच्या आरोग्याच्या अन्य बाबी लक्षात घेऊन १५ दिवसांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी त्यावेळी स्पष्ट केल होते. यानुसार शरद पवार यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात असून यशस्वीरित्या पार पडली आहे. तसेच, शरद पवारांची तब्येत स्थिर असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
दरम्यान, शरद पवार यां च्या पित्ताशय नलिकेतील एक खडा एडोस्कोपीसद्वारे काढण्यात आला होता. ही शस्त्रक्रियाही ब्रीच कॅंडी रुग्णालयात करण्यात आली होती.







