जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ११ तालुक्यांमधील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदार संघातील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले . चोपडा , रावेर , यावल आणि भुसावळ या चार तालुक्यांमधील सोसायटी मतदार संघांसाठी मात्र निवडणूक अटळ आहे
जळगाव तालुक्यातून शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन आता जिल्हा बँकेच्या संचालक झाल्या आहेत . पारोळा तालुक्यातून शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील , अमळनेर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील , एरंडोल तालुक्यातून अमोल चिमणराव पाटील , मुक्ताईनगर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे , चाळीसगाव तालुक्यातून जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रदीप देशमुख , पाचोरा तालुक्यातून शिवसेनेचे आमदार किशोर पाटील , जामनेर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पाटील , धरणगाव तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार , बोदवड तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अँड रवींद्रभैय्या पाटील , भडगाव तालुक्यातून शिवसेनेचे प्रताप हरी पाटील हे जिल्हा बँकेचे सोसायटी मतदारसंघातील संचालक झाले आहेत .
आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपले सगळे उमेदवार मागे घेतल्याने हा महत्वाचा परिणाम दिसून आला आहे.