जळगाव (प्रतिनिधी) – येथील महेश ईश्वर ठाकूर यांची युवा सेनेच्या महानगर समन्वयकपदी नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले आहे. निष्ठावंतांना पक्ष नेतृत्व संधी देते. दिलेल्या जबाबदारीतून पक्षवाढीसाठी काम करायला आवडेल अशी माहिती महेश ठाकूर यांनी दिली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, जळगाव जिल्हा विस्तारक चैतन्य बनसोडे, जिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी यांच्या मार्गदर्शनाने नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती प्रसंगी महानगर प्रमुख शरद तायडे, पियुष गांधी, विशाल वाणी, जिल्हा चिटणीस अंकित कासार, महानगर अधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे, गणेश गायकवाड, रोहित पाटील, राकेश थोरात, आदी शिवसैनिक उपस्थित होते. माझ्यासारख्या निष्ठावंताला संधी मिळाली असून याबाबत पक्ष वाढीसाठी नक्कीच प्रयत्न करेन अशी माहिती महेश ठाकूर यांनी दिली आहे.