पारोळा(प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव महाजन यांनी कुटीर रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित आर्थिक मदत दिली. तसेच रुग्णालयातील स्वच्छतेच्या समस्या जाणून घेत रुग्णालयाला स्वच्छता साहित्यदेखील भेट दिले.

नामदेव महाजन यांनी कोरोना काळातही शहरातील गोर गरिबांची सेवा करत किराणा साहित्यसह संसारोपयोगी लागणारी इतर मदतही त्यांनी निस्वार्थपणे उपलब्ध करून दिली होती. अनेक सामाजिक संघटनांनी त्यांचा गौरव करत कोरोना योद्धा म्ह्णूनही त्यांना पुरस्कृत केले आहे. संबंधित ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांचा पगारास विलंब होत असल्याने महाजन यांनी ऐन सणासुदीला कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करत दिवाळी गोड केली आहे. यावेळी डॉ. योगेश साळुंखे, डॉ. तुषार पाटील, कुणाल बागड, योगेश पाटील, गणेश खैरनार, देविदास मरसाडे, राजेश सोनार, अभिजित पाटील, भूषण पाटील इत्यादी उपस्थित होते.







