जळगाव (प्रतिनिधी) – भारत ट्रक आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अधिवेशन चेअरमन किताबसिंह चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शहरात रविवारी ८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आले. यावेळी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी संघटनेचे हरीयाणाचे कार्याध्यक्ष रविंद्र बाधानी, राजस्थानचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल अरोरा, गुजरात उपाध्यक्ष जयभगवान बल्लार, ओडीसाचे अध्यक्ष राजकुमार यावद, राष्ट्रीय सल्लागार राममेहर शर्मा, हरीयाणा प्रभारी अध्यक्ष मानजितसिंग, राष्ट्रीय प्रवक्ता अनिल कुमार भरद्वाज, महाराष्ट्र प्रभारी राजेश अग्रवाल, नागपूरचे भाऊराव रेवतकर यांची उपस्थिती होती.
जाहीर केलेल्या कार्यकारिणीत जळगाव जिल्हा अध्यक्षपदी रामकिशन वर्मा यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी नंदू पाटील, विधी सल्लागार पदी ॲड. सचिन पाटील, महासचिवपदी श्याम सुंदर शर्मा, कोषाध्यक्षपदी मांगिलाल पारीख, सहसचिवपदी कासीम पटेल, वरिष्ठ सल्लागार पदी बलविर शर्मा, सल्लागारपदी हरजितसिंग सैनी, मनोज पांडे, प्रविण कौशिक, हरीष शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी ट्रान्सपोर्ट व्यवसायिक तसेच ट्रक चालक, मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत ट्रक आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आयोजित अधिवेशनात ट्रक चालक मालक व ट्रान्सपोर्ट यांना येणाऱ्या अडीअडचणी निवारण करण्यासाठी आणि उपाययोजनांसाठी जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.