मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – शहरातील विविध समाज उपयोगी उपक्रमांचा पांडा रचणारे व कार्यक्रम राबवणाऱ्या वंदे मातरम् ग्रुप तर्फे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्रीराम नगर (भिल्ल वस्ती) परिसरात दिवाळीचा फराळ वाटप स्वच्छता शिक्षण सारख्या सामाजिक जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार श्वेता संचेती या होत्या तर प्रमुख उपस्थितांमध्ये जळगाव जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सरचिटणीस डॉक्टर जगदीश दादा पाटील, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ता एडवोकेट विनोद इंगळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील सर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आत्माराम भाऊ जाधव, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भाऊ भोई ,मुक्ताई साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ पाटील, अडवोकेट राहुल पाटील, मोहन मेढे ,धनंजय सापधरे हे प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित समाज बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन आरोग्य व स्वच्छता या संदर्भातही जनजागृती करण्यात आले मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून शिक्षण आरोग्य यासह सामाजिक बांधिलकी चे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक वाडेकर सर यांनी तर आभार धनंजय सापधरे यांनी मानले.
*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल भोजने, आकाश बोरे, सिताराम उन्हाळे ,रमेश पवार, शुभम तळेले, सुमित बोदळे ,राहुल माळी, राहुल शुरपाटने, सागर श्रीखंडे, योगेश कपले, दिपक माळी, आतीक खान, गंगाधर बोदडे,सुरज कपले, संकेत कपले, निलेश महाजन यांनी परिश्रम घेतले.