पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा शहरात आजमितीला छत्रपती शिवराय , डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राणी लक्ष्मीबाई यांचे तीन पुतळे उभे आहेत. शहराचा विस्तार वाढत गेला व बदल होत गेला मात्र साधारणतः ३०-३५ वर्षा पासूनचे हे पुतळे व सुशोभीकरनामध्ये काहीही बदल झाला नाही. उलट या महामानवांच्या पुतळ्यांच्या अवती-भोवती अतिक्रमणे वाढले असून पुतळा आहे की, नाही असे वाटते. पुतळ्यांच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य वाढले आहे.

शहरात जेम – तेंम तीनच पुतळे असून झोपेचे सोंग घेतलेली पारोळा नगरपरिषद व स्थानिक लोकप्रतिनिधी या महामानवांच्या पुतळ्याकडे व पुतळ्यांच्या आजूबाजूस असणाऱ्या घाणीकडे साफ दुर्लक्ष करत आहे.तरी महामानवांच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण काढून पुतळ्यांचे सुशोभिकरण करावे अशी मागणी जन मानसातून होत आहे.







