जळगाव (प्रतिनिधी) – येथील सुवर्ण नगरीतील प्रथितयश आणि प्रामाणिकता, शुद्धता, पारदर्शकतेचे प्रतीक रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे कोरोना काळात नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी शहरात दोन ठिकाणी ज्वेलर्सची सेवा १३ नोव्हेंबर रोजी देण्यात येणार असल्याची माहिती रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे देण्यात आली आहे.
प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले राहावे, आनंदित राहावे, अशी कामना रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे करण्यात येत आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी होऊ नये यासाठी तसेच कोरोनापासून दूर राहण्यासाठी खास धनत्रयोदशी निमित्त शहरात एक दिवसासाठी सोने विक्रीचा स्टॉल सुरु करीत आहेत. यात शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी महेश प्रगती हॉलच्या बाजूला संकल्प हॉस्पिटलच्या तळमजल्यात रिगरोडवर आणि काव्य रत्नावली चौकातील मिटिंग पॉईंट हॉल येथे सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सची सेवा देण्यात येणार आहेत. यात शुद्ध सोन्याचे शिक्के, तुकडे, शुद्ध चांदीचे शिक्के, दागिने बुकिंग आदी सेवा मिळणार आहेत. नागरिकांनी सेवेचा लाभ घ्यावा, बाजारात गर्दी टाळावी, असे आवाहन रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहेत.








