जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील अट्टल घरफोड्यास स्थानिक गुन्हे शाखेकडून बुधवारी अटक करण्यात आली असून त्याला पुढील तपासासाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाल यांना गोपनीय माहिती मिळाली होती. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घरफोड्या शेख मोहसीन शेख मुन्ना उर्फ बिल्लू , रा. आगाखानवाडा , भुसावळ याने केल्या आहेत. त्यानुसार बकाले यांनी पोहेकॉ शरीफ काझी, पोना युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, दीपक चौधरी आशयाचे पथक रावण केले होते. पथकाने शेख मोहसीन याला ताब्यात घेत चौकशी केली. त्यात त्याने भुसावलमधील स्टार मोबाइलला व श्रीराम स्टोअर्सचे गोडावून मधून चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याने २३ हजार २०० रुपये किमतीच्या पॉवर बँक, त्याचा मित्र इम्मू रा. मुक्ताईनगर यांच्याकडे ठेवल्याचे सांगितले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.