जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. त्यांना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
याबाबत पोलीस निरीक्ष किरणकुमार बकाले यांनी बुधवारी ११ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत संध्याकाळी माहिती दिली. दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून पोहेकॉ संजय हिवरकर, राजेश मेढे, रवी नरवाडे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, महेश महाजन यांचे पथक रवाना केले होते.
पोनी बकाले यांना मिळालेल्या माहितीवरून शहरातील काही तरुण दुचाकी चोरून त्याचे स्पेअर पार्टस वेगेळे करून विक्री करीत आहेत. त्यानुसार एमआयडीसी पोलिसस्टेशन हद्दीतील दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेली दुचाकी हि सुप्रीम कॉलनीतील रहिवासी शाहरुख सलीम खान आणि अमन सय्यद रशीद यांनी चोरली असल्याची माहिती मिळाली. त्यांनी शहरासह जिल्ह्यात दुचाकींची परस्पर विक्री करीत स्पेअरपार्टस देखील विकले आहेत. त्यानुसार दोघांना चोरीच्या पैसातून मौजमजा करण्यासाठी सुरत येथे पळून जात असतांना अग्रवाल चौकातील राष्ट्रीय महामार्गावर ताब्यात घेतले. त्यांनी ११ दुचाकी चोरी केल्या असून त्यापैकी ४ इम्रान रमजान पटेल रा. सुप्रीम कॉलनी यांच्याकडे विल्हेवाट करण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यांच्याकडे ४ बनावट चाब्या मिळून आल्या. स्पेअरपार्टस मागणीप्रमाणे ग्राहकांना हे चोरटे विक्री करीत असत. या आरोपींकडे ९ मोटर सायकल, २ लाख, ५२ हजार रुपये किमतीच्या मिळून आल्यात. त्यानुसार तिघांना ताब्यात घेत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.