पाचोरा (प्रतिनिधी) – येथील नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मागणी नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आलेली होती यावर चर्चा विनीमय करण्याकरीता म.नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सकाळी 11.30 वाजता सर्व न.पा.कर्मचा-यांची बैठक नगरपालिका सभागृहात बोलाविण्यात आलेली होती.
बैठकीचे प्रास्तावीक उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी केले बैठकीत म.नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, लेखा विभागाचे कर्मचारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांचेमध्ये साधक – बाधक चर्चा विनीमय करण्यात आला व झालेल्या चर्चेस मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी दिलेल्या मंजूरीनूसार सर्वानुमते वर्ग-3 कर्मचाऱ्यांकरीता रक्कम रुपये 40,000/-, वर्ग 4 कर्मचाऱ्यांकरीता रक्कम रुपये 30,000/- त्याच प्रमाणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रक्कम रुपये 10,000/- मात्र 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रुपाने देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.