चोपडा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नागलवाडी रोडवर रात्री पोलिसांनी बेकायदेशीर सुगंधित पानमसाला व गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले सुमारे २५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चोपडा ते नागलवाडी रोडवर शिवमंदिराजवळून पिकअप व्हॅनमध्ये बेकायदेशी सुगंधित पानमसाला व गुटखाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी मिळाली. पोलिसांनी नागलवाडीरोडवर सायंकाळी कारवाई करत एमएच २० सिटी ६९६४ क्रमांकाच्या वाहनांची तपासणी केली व्हॅनमध्ये २० लाख ४० हजार ४०० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला तंबाखू आणि गुटखा आढळून आला. संशयित आरोपी चंद्रकांत लक्ष्मण हटकर (वय-३५ , रा. तांबापुरा ) आणि अजय अरुण पाटील (रा. चोपडा ) यांची नावे चौकशीत समोर आली पो ना हेमंत कोळी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चंद्रकांत हटकर आणि अजय पाटील यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास स पो नि संतोष चव्हाण करीत आहेत .