यावल ( प्रतिनिधी ) – टेंभी गावठाण शिवारातून ट्यूबवेलची केबल वायरसह इतर वस्तू चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देविदास शंकर सूर्यवंशी (वय-५८ रा. शिवाजीनगर यावल ) यांचा शेती आणि दूध व्यवसाय आहे. त्यांचे तालुक्यातील टेंभी गावठाण शिवारात गट नंबर २५०८ मध्ये शेतात ट्यूबवेल केलेले आहे. या टुबवेलजवळ देवीदास सुर्यवंशी यांनी थ्री फेज वायर केबल आणि कॉपर कण्डक्टर ठेवलेले होते. १० एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ६ हजार रुपये किमतीची केबल आणि व कंडक्टर चोरून नेले. हा प्रकार दुसऱ्या दिवशी उघडकीला आला. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु कुठेही माहिती मिळाली नाही. अखेर देविदास सूर्यवंशी यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली १० एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना महेंद्र ठाकरे करीत आहेत.