कंत्राटी सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी
२ लाख १० हजारांची मागणी
जळगाव ( प्रतिनिधी ) – कंत्राटी सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी २ लाख १० हजारांची मागणी करून ३० हजारांची लाच घेताना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपाई आज लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पकडला .
जळगाव येथील तक्रारदाराने या शिपायाची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली होती . गोपाळ कडू चौधरी, ( वय-55, रा.जुना खेडी रोड, DNC कॉलेज जवळ, जळगावं ) असे या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील आरोपी शिपायाचे नाव आहे .
तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असुन त्यांनी जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कंत्राटी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळणेबाबत अर्ज सादर केला होता कंत्राटी सिक्युरीटी गार्डची नोकरी लावून ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे चौधरी यांनी पंचासमक्ष प्रथम 2,10,000/-रुपये लाचेची मागणी केली लाचेच्या रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून 30,000/- रुपये स्वतः चौधरी यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जळगाव परीससरात स्वीकारले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील पुढील तपास करीत आहेत . स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर , प्रदिप पोळ यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.