जळगाव (प्रतिनिधी) – येथील सागर पार्क मैदानावर १२ ते १४ एप्रिल दरम्यान संत गाडगेबाबा प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी झाले असून तयारी पूर्ण झालेली आहे.
स्पर्धेचे उदघाटन उद्या संध्याकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. सामने सकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. स्पर्धेत “अ” गटात के के किंग्स मेहरूण इलेव्हन, गाडगे बॉईज, जय गाडगे चॅम्पियन्स, परीट सुपर किंग्स असे संघ असून “ब” गटात मेहरूण धोबी पछाड, गाडगे वोरीयर्स, डेबूजी रॉयल्स, डेबूजी वोरीयर्स हे संघ सहभागी झालेले आहेत.
स्पर्धेत १२ व १३ रोजी दिवसाला प्रत्येकी ६ सामने खेळवले जाणार असून अंतिम दिवशी १४ रोजी उपांत्य सामने, तृतीय बक्षिसांचा सामना आणि अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दिलीप शेवाळे, अरुण शिरसाळे, सुरेश ठाकरे, संदीप सोनवणे, चेतन शिरसाळे, दीपक बाविस्कर, प्रवीण आढाव, अविनाश देवरे, गणेश सुरसे, यशवंत सपकाळे, संतोष बेडिस्कर, मनोज निंबाळकर, गणेश सपके, सागर महाले, अँड. सतीश पवार, मयूर थोरात यांच्यासह आयोजन समिती परिश्रम घेत आहे.