फैजपूर ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील न्हावी येथील ३० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याने सासू-सासरे व दिर यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्हावी येथील विवाहिता पती व मुलांसह वास्तव्याला आहे. ९ मार्चरोजी सकाळी विवाहितेचे सासरे त्यांना दारूचे व्यसन असल्याने घरात यांचा कौंटुबिक वाद झाला. यावरून दिराने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली व विनयभंग केला. भांडण सोडवण्यासाठी विवाहितेचा पती आला असता त्याला देखील मारहाण केली आणि तुझ्या मुलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात दीर, सासू आणि सासरे यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे कॉ राजेश भराटे करीत आहेत.