मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील माणेगाव शिवारातील नदीच्या बेटाजवळ बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी मुक्ताईनगर पोलिसांनी उद्ध्वस्त करून ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला.
मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत माणेगाव येथे बेकायदेशीर दारूची हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार माणेगाव शिवारातील नदीमधील बेटाजवळ पोलिसांनी १० मार्च रोजी सकाळी धाड टाकली. दारू तयार करण्याचे कच्चे व पक्के रसायन पूर्णपणे नष्ट करण्यात आले. ५९ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित आरोपी शांताराम जयराम बेलदार ( रा.माणेगाव ता. मुक्ताईनगर) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. पो. कॉ. रवींद्र धनगर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शांताराम बेलदार यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो. नि. यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. अशोक जाधव करीत आहेत.