पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शेळावे खु येथे पाण्याच्या वादात एका महिलेचा मृत्यू झाला . अन्य दोन जण या भांडणात जखमी झाले.
शेळावेखुर्द येथे पाणी भरण्याचा वादावरून रागाच्या भरात टेम्पोची धडक देऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 10 जून रोजी सकाळी घडली. विहिरीचे पाणी भरण्याचा कारणावरून भावकीमध्ये वाद चालू होते. याच वादाचा राग येऊन रागाच्या भरात संशयीत राहुल दत्तू सांगळे ( वय 22 ) याने चिखलोड रस्त्यावर उभ्या असलेल्या अलका बापू सांगळे ( वय 45 ) यांच्या अंगावर टेम्पो चालवून जबर धडक दिली . या धडकेमुळे अल्काबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला विद्या महेंद्र सांगळे , मनीषा दत्तू सांगळे, अविनाश प्रभाकर सांगळे हे जखमी झाले आहेत. या जखमींना कुटीर रुग्णालय पारोळा दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत . बापू काळू सांगळे यांच्या फिर्यादीवरून संशयित राहुल दत्तू सांगळे व दत्तू काळू सांगळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत.