जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज सोमवार दि. ११ जानेवारी रोजी पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आज ५७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४९ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. आज जिल्ह्यातील चार तालुके निरंक आढळून आले आहे.

जळगाव शहर – २०, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-५, अमळनेर-७, चोपडा-९, पाचोरा-१, भडगाव-३, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-०, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-२, बोदवड-० असे एकुण ५७ बाधित रूग्ण आढळले आहे.
सोमवार दि. ११ जानेवारी रोजीच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ५६ हजार ३७५ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ५४ हजार ५३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४९७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज चोपडा तालुक्यातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण १ हजार ३३९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.







