जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात मंगळवारी (११ जानेवारीरोजी) दिवसभरात २२१ बाधित रूग्ण आढळून आले आहेत . तर सहा बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.
जळगाव शहर- ४३, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ – १०७, अमळनेर- ०, चोपडा- ३२ , पाचोरा -०५, यावल- ० , जामनेर- ०, एरंडोल ०५ , रावेर- ०, पारोळा -०२, चाळीसगाव -१४, मुक्ताईनगर -१ , बोदवड -१, आणि इतर जिल्ह्यातील ०७ असे एकुण २२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ६०७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २६१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ७६७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत.