जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असताना जळगाव जिल्ह्यातील नववी ते बारावी वर्गाचे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरुवात झालेली आहे. जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी ये – जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हेडसांड होत आहे. विद्यार्थ्यांचा व अनेक तक्रारी लक्षात घेता ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना बस पासेस मिळाव्या तसेच बससेवा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी अभाविप जामनेर शाखेच्यावतीने जामनेर आगारप्रमुख कमलेश धनराले यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. विद्यार्थी हित लक्षात घेता लवकर मांगणी पूर्ण करावी अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन करेल अशा ईशारा अभाविप जामनेर शाखेच्या वतीने देण्यात आला. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिति सदस्य मनोज जंजाळ, शहर सहमंत्री कल्पेश सोनवणे, चेतन नेमाडे, पवन बाविस्कर उपस्थित होते.