जळगाव (प्रतिनिधी) – ग.सं. सोसायटीची पंच वार्षिक निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्याच्या निर्णय सहकार विभागाने घेतला पण आता त्वरित निवडणूक घ्याव्यात व त्याआधी प्रशासन नेमावा विद्यमान संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात बोगस नोकर भरती केली. सर्व विश्वस्थ मंडळाने स्वता : चे नातेवाईक किंवा आपले हित संबंधी स्वतांचे हित साधून भरती केले आहेत.
हे चाळीस हजार सभासदा पासून लपून नाही तसेच धनस्वर्थासाठी आपापसात पाच वर्ष चोरावर मोर झालेले विश्वस्थ सर्वश्रूत आहे आता तर सर्वशाखान मध्ये नवीन फर्निचर बनवण्याचा घाट घालून करोडोंनचा भष्ट्राचार करण्याची तयारी सुरु आहे. तरी सहकार विभागाने यांचा गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी प्रविण जाधव यांनी केला ग.सं.संचालक मंडळाने ठेवीदरात विरोधी भूमिका घेऊन नवीन ठेवी बंदच केल्या शिवाय ज्यांच्या आहे व त्यांना आयकराचे विभागाचेपत्र पुढे करून जेष्ठ नागरिकांचा तर काठीचा आधार काढून घेतला सभासदाच्या मासिक वर्गणित आधिच कपात केली, पर्यायाने कर्ज वितरणावर परिणाम झालाच. ठेवीनवरचे व्याज कमी केलेत तर स्पेशल कर्जावरील व्याज दरात पण अजून कपात होणे अपेक्षित आहे तसेच जामीन कर्ज मर्यादेत पण वाढ व्हावी संचालक मंडळाच्या हुकुमशाही पद्धतीच्या निर्णयामुळे ठेवी कमी होवून. कर्ज उचल सुध्दा कमी झाली करण इतर पगारदार पतसंस्थानचा तुलनेने व्याज दर कमी आहेत पर्यायाने ग.सं. संस्थेवर परिणाम होत आहे. म्हणून या पुढेसंचालक मंडळाचा धोरणात्मक निर्णय थांबवून, त्वरित प्रशासकांची नेमणूक होवून पारदर्शी निवडणूक पार पाडवी.अशी भाजपा शिक्षण पदधिकारी प्रविण जाधव संजय वानखेडे, दुष्यत पाटील, प्रविण धनगर, पांडुरंग पाटील, संदीप घुगे, विजय गिरणारेर, संतोष भावसार, किरण पाटील, एन.आर.दानी, यांनी केली आहे.