जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील एका भागात ३२ वर्षीय तरुणीही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेत आहे. दरम्यान तिची ओळख चंदन मोतीराम चौधरी रा. खिर्डी तालुका रावेर जिल्हा जळगाव याच्याशी झाली. दरम्यान त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पीडीतीने बुधवारी १० ऑगस्ट रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चंदन मोतीराम चौधरी राहणार खिर्डी ता. रावेर जि.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार करीत आहे.