जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात व खाजगी प्राथमिक शाळेतर्फे आज शिरसोली प्र न गावात हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत घरोघरी तिरंगा ध्वज लावावा याबाबत गावातील लोकांमध्ये जनजागृती व्हावी व लोकांनी 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावा याबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत गावातील परिसर दणाणून टाकला.या रॅलीत शाळेचे सचिव श्री सुरेश पुंडलीक अस्वार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बारी, शाळेचे मुख्याध्यापक पी पी कोल्हे सर ,खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जी पी बारी सर,पर्यवेक्षक एस एस बारी ,शिक्षक आर के पाटील ,आर एस आंबटकर ,सी एस कुमावत डीजे कुलकर्णी ,एस के काटोले, ए टी बावसकर, एस जे बारी, अंभोरे सर ,श्रीमती एस आर वैष्णव, डी के पाटील तसेच शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.