जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहराती सुप्रिम कॉलनी परिसरातील तीन संशयितांना वारंवार चोरी घर फोडी, हाणामारी अशी गंभीर गुन्हे करणाऱ्याने दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी कारवाई केली आहे.
पिन्या रोहिदास चव्हाण (वय – २३), सोनूसिंग ऊर्फ सोन्या रमेश राठोड (वय – २३) व उमेश ऊर्फ साई सोनाजी आठे (वय – २७) तिन्ही रा. सुप्रिम कॉलनी अशी कारवाई करण्यात आलेल तिघाही संशयितांची नावे आहेत.
पिन्या रोहिदास चव्हाण ( वय २३ ), सोनूसिंग उर्फ सोन्या रमेश राठोड ( वय २३ ) व उमेश ऊ र्फ साई सोनाजी आठे ( वय २७ ) तीन्ही रा. सुप्रिम कॉलनी हे तीनही संशयित एमआयडीसी परिसरात वारंवार चोरी, घर फोडी, मारामारी सारखे गंभीर गुन्हे करत असल्याने त्यांना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होत. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी बुधवारी तिघांना दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
दिनकर चव्हाण यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन, जामनेर पोलीस स्टेशन, नशीराबाद पोलीस स्टेशन अशा विविध पोलीस ठाण्यात १९ चोरी, घर फोडी, जबरी लूट असे गुन्हे दाखल आहेत तर सोनूसिंग राठोड यांच्यावर चोरी, घर फोडी व शस्त्र अधीनियमांतर्गत एकूण ७ गुन्हे तर उमेश सोनाजी आठे याच्यावर चोरी घर फोडीचे एकूण ७ गुन्हे दाखल आहे, त्यामुळे तिघांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.