जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात काही भागांमध्ये शांतता असतांना चौघुले प्लॉट भागात जुन्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले असून यात एका गटाने फायरिंग केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे.


याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील शनिपेठ भागातील चौघुले प्लॉट परिसरात आज दुपारी ४.३० वाजेच्या दरम्यान दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. दोन्ही गटांमध्ये सदर हा जुना वाद असल्याचे समजले आहे. याप्रसंगी एका गटाकडून गोळीबार केल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबार झाल्यानंतर दोन्ही गटाच्या तरूणांनी घटना स्थळावरून पलायन केल्याचे समजते.
सदर घटनेचे माहिती मिळताच शनिपेठ व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चौकशीला सुरुवात केली आहे. गोळीबार केल्यानंतर खाली पडलेले गोळीचे आवरण पोलिसांना आढळून आले असून ते पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलेले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे , अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. सदर या परिसरातील लोकांकडून माहिती घेण्याचे काम चालू आहे. सदर या घटनेबाबत संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.







