वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार झाला आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असून डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत.
माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरु होताच काही मिनिटातच त्यांना कक्षातून बाहेर नेण्यात आले. यावेळी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, नंतर ट्रम्प यांनी स्वत:च गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली.
ट्रम्प म्हणाले कि, व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार झाला. मात्र परिस्थितीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात आले. यासाठी मी गुप्तहेराचे आभार मानतो. सुरक्षा यंत्रणेनी गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. आरोपीला गोळी लागली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.







