मनवेल ता.यावल (प्रतिनिधी) – येथील श्री स्वामी रेवांनद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या श्राध्द सोहळा दि.११ सप्टेंबर शुक्रवारी रोजी होणारा कार्यक्रम कोरोणाच्या पार्शभुमीवर प्रशासना कडुन परवानगी न मिळाल्याने रद्द करण्यात आला आहे.

स्वामी रेवांनद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या श्राध्द सोहळा दरवर्षी अविधवा नवमीला धुनीवाले दादाजी दरबारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो मात्र कोवीड १९ च्या पार्शभुमीवर प्रशासनाकडुन परवानगी मिळाली नसल्यामुळे श्री धुनीवाले दादाजी भक्तगण यांनी घरीच श्री स्वामी रेवांनद व धुनीवाले दादाजीच्या फोटोचे प्रतिमा पुजन करुन श्राध्द सोहळा साजरा करण्यात यावा असे आवाहन मनवेल ग्रामस्थानी केले आहे.







