मनवेल ता. यावल (प्रतिनिधी) – माजी राष्ट्रपती – शिक्षण तज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३२ व्या जयंती दिनानिमित्त दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे कोरोनाच्या काळामध्ये ज्या उपक्रमशील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले अशा शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई-पुरस्कार जाहीर करण्यात आला.

फाउंडेशनकडे एकूण १२५ ऑनलाईन प्रस्ताव महाराष्ट्रातून पाठवण्यात आले होते. त्यापैकी ४१ पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. यामध्ये थोरगव्हाण येथील जि.प.शाळेतील उपशिक्षक निलेश धर्मराज पाटील यांना देखील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई – पुरस्कार जाहीर झाला आहे…
यावल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी नईम शेख , साकळी केंद्राचे केंदप्रमुख विजय ठाकूर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पोलीस पाटील गजानन चौधरी , शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देवरे, सर्व शिक्षक व गावकऱ्यांतर्फे निलेश धर्मराज पाटील सरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सावित्रीबाई फुले हेच माझे आदर्श -निलेश पाटील
मला शिक्षक दिनाच्या दिवशी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई – पुरस्कार मिळाला. ही माझ्या कामाची पावती आहे असे मी समझतो. माझ्या विद्यार्थ्याना नव – नवीन उपक्रमातुन शिक्षण देणे मी माझे कर्तव्य समजतो. राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले हेच माझे आदर्श आहेत. आज मला मनस्वी आनंद होत आहे.असे निलेश धर्मराज पाटील यांनी ‘केसरीराज’शी बोलताना सांगितले.







