चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव-धुळे रसत्याववरील असलेले खड्डे हे जिवघेणी ठरत आहेत.राञी भरधाव कुठल्यातरी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने यात चालकाचा जागीच मृत्यु झाला.त्याच्या सोबत असलेला दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना चाळीसगाव-धुळे रत्यावर बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. मृत तरुण तरवाडे (ता,जि.धुळे) येथील आहे.

चाळीसगाव – धुळे रस्त्यावर असलेली जीवघेणी अपघाला कारणीभुत ठरत आहेत. या रसत्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असले तरी निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे.या रस्त्यावर काल निपराध तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेतील मयत आनंदा चुडामण तलवारे (वय35) त्याच्या सोबत एक इसम (नाव, गाव माहित नाही) हे बुधवारी सायंकाळी (एमएच.41यू.3467) या दुचाकीने चाळीसगावकडून तरवाडे येथे जात असतांना खडकीफाटा ते चिंचगव्हाण दरम्यान दत्त मंदिराच्या पुढे कोणत्यातरी भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात आनंदा तलवारे या तरुणाला जास्त मार लागल्याने जागीच मृत्यु झाला. त्याचेसोबत असलेला अनोळखी इसम गंभीर जखमी झाला. ही धडक इतकी जबर होती की मोटारसायकलीचा चक्काचूर झाला. धडक देणारा अज्ञात वाहनचालक पळून गेला. याप्रकरणी शामा तलवारे रा. (तरवाडे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास एएसआय पृथ्वीराज कुमावत करीत आहेत.







