जळगाव ( प्रतिनिधी ) – कामाचे बिल देण्याच्या बदल्यात ठेकेदाराकडून ११ हजार रुपयांची लाच घेताना काल चोपडा तालुक्यातील वर्डी येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या धुळ्याच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले .
तक्रारदार ठेकेदार आहेत . आरोपी भगवान पांडुरंग यहीदे हे ग्रामपंचायत वर्डी,ता चोपडा येथील ग्रामसेवक आहेत . चोपड्यातील बोरवले नगरात ते राहतात तक्रारदार ठेकेदाराने पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत निधीतून गटार व ढापे बांधण्याचे काम पुर्ण केले कामाचे बिल अदा होणेकामी आरोपीने तक्रारदार यांच्याकडे पंच साक्षीदारांसमक्ष 12500/- रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 11,000/- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारले. सापळा कार्यवाही दरम्यान आरोपीला यांना ताब्यात घेण्यात आले लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, मोरे , सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली .