धरणगाव ( प्रतिनिधी ) – गुरांना बाजारात घेवून जात असलेल्या वाहनाला अडवून चालकासह एकाला १० ते १२ जणांनी बेदम मारहाण करून जबरदस्तीने पैसे हिसकाविल्याची घटना घडली धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मेहुल सुनिल शिरसाठ (वय-२४ , रा. धनगर गल्ली ता. चोपडा ) हे खासगी वाहन चालक आहेत. ९ मे रोजी सकाळी ते कालू उखा चव्हाण यांच्या सोबत जामनेर येथील गुरांच्या बाजारात गुरे विक्री करण्यासाठी (एमएच १९ सीवाय ६९८४ ) ने जात होते. चोपडा ते धरणगाव दरम्यान साळगाव गावाजवळ १० ते १२ जणांनी रस्त्यावर वाहन आडवे लावून मेहुल शिरसाठ यांचे वाहन अडविले. मेहूल आणि कालू या दोघांना बेदम मारहाण करून त्यांचे ७ हजार २०० रूपये जबरी काढून नेले . या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भैय्या माळी आणि त्यांच्यासोबत असलेले १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो उ नि अमोल गुंजाळ करीत आहेत.