फैजपूर ( प्रतिनिधी ) – घरासमोरच्या पार्किंगमधून १ लाख रूपये किंमतीची बुलेट चोरट्यांनी चोरून नेली. फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
युवरात पोपट चोपडे (वय-२६ ) हे बसस्थानक जवळ, न्हावी, ता. यावल येथे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत शेती करून उदरनिर्वाह करतात. ८ मे रोजी रात्री त्यांच्या मालकीची एमएच १९ सीएल ५५५८ क्रमांकाची बुलेट त्यांच्या घरासमोर होती . अज्ञात चोरट्यांनी ही बुलेट चोरून नेल्याचे पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीला आले, त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु बुलेट कुठेही मिळून आली नाही. ९ मे रोजी युवराज चोपडे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस हे कॉ राजेश बऱ्हाटे करीत आहेत.