पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ स्वप्निल पाटील यांचा नुकत्याच एका कार्यक्रमात सप्तरंग फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला
पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ स्वप्निल पाटील यांनी तीन वर्षापासून हॉस्पिटलच्या माध्यमातून पाचोरा व भडगाव तालुक्यातील , शहरातील व सर्व खेड्यापाड्यातील नागरिकांना कुठलाही आजार असो त्यासाठी तात्काळ सेवा देऊन कुठल्याही आजाराचा पेशंट असो त्याला जळगाव जाण्याची वेळ येऊ दिली नाही , अशी त्यांची ख्याती आहे . त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपकरणे उपलब्ध असल्यामुळे पेशंटची काळजी घेतली जाते
डॉ स्वप्निल पाटील यांनी कोरोना काळातही अनेक पेशंटांना जीवदान दिले प्रत्येक खेड्यात आरोग्य शिबिर भरून खेड्यातील नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या, या सर्व कामाची दखल घेत जळगाव येथील सप्तरंग फाउंडेशन या संस्थेतर्फे डॉ स्वप्निल पाटील यांना “आरोग्य दूत पुरस्कार 2022” देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना सिने अभिनेत्री शिवाली परब (महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम) यांच्या हस्ते देण्यात आला, यावेळी रावेर येथील श्री साईराम प्लास्टिक व श्रीराम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम पाटील , जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सिने अभिनेत्री विना जगताप उपस्थित होत्या .