जळगाव ( प्रतिनिधी ) – नेरी नाका परिसरातील स्मशानभूमीजवळून रिक्षेत बसून जाणाऱ्या प्रवाशाचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला . शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश सुकदेव शेळके (वय-२४ , रा. चिंचोली ता. जळगाव ) ८ एप्रिल रोजी सायंकाळी नेरीनाका स्मशानभूमीजवळ रिक्षात बसलेला होता. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांचा २० हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. त्यांनी रिक्षासह परिसरात शोधा केली मोबाईल कोठेही आढळला नाही. ९ एप्रिल रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास स फौ मनोज इंद्रेकर करीत आहेत.