यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील पिंप्री शिवारात तापी नदी पात्रावरील तीन गावठी हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकून ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल तालुक्यातील पिंप्री शिवारात तापी काठावर बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी असल्याची गोपनीय माहिती फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना शनिवारी मिळाली. फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालय आणि यावल पोलीस ठाणे यांनी शनिवारी तीन ठिकाणी वेगवेगळे छापे टाकून ४२ हजार रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन, तयार केलेली गावठी दारू नष्ट करण्यात आली यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आकाश निवृत्ती कोळी, पांडुरंग प्रकाश सपकाळे आणि दिलीप पुना कोळी ( तिघे रा. पिंप्री ता. यावल ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक फौजदार अविनाश चौधरी, पोहेकॉ दिलीप तायडे, सुमित बाविस्कर, रशिद तडवी, अशोक जावळे, किशोर परदेशी, पो ना संदीप सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.