जळगाव ( प्रतिनिधी ) – पाळीव कुत्रा घरात घुसल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला बेदम मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या रामेश्वर कॉलनीतील आरोपींवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील शांतीनगरात सुलोचना जगदिश चव्हाण (वय – २९) वास्तव्यास आहे. याच परिसरातील हिम्मत पवार (पुर्ण नाव माहित नाही) यांनी पाळलेला कुत्रा शनिवारी सकाळी सुलोचना यांच्या घरात घुसला. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने हिम्मत पवार याने महिलेला शिविगाळ करीत त्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करीत असतांना त्यांनी महिलेला रस्त्यावर ढकलून दिल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्या जखमी झाल्या आहे. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हिम्मत पवार यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास महेंद्र पाटील हे करीत आहेत.