जळगाव ( प्रतिनिधी ) – नियमित व्यायाम केल्याने शरीर सुदृढ राहते या संकल्पनेतुन आय.एम.ए. जळगावचे सचिव डॉ.जितेंद्र कोल्हे ,अध्यक्ष डॉ.दीपक आठवले यांनी महिला डॉक्टरांसाठी मोहाडी येथील टेकडीवर १० एप्रिल रविवारी पहाटे ट्रेकिंगचे आयोजन केले होते .
आय.एम.ए.स्पोर्ट विंगचे सचिव डॉ.मनीष चौधरी, अध्यक्षा डॉ.वृषाली पाटील यांनी या ट्रेकचे नियोजन केले.सूर्योदयापूर्वीच सुरू झालेल्या या ट्रेकमध्ये सुमारे ७५ महिला डॉक्टरांनी जळगाव शहरातून मोहाडीपर्यंत पायी जात सहभाग नोंदविला. मोहाडीच्या टेकडीवर गेल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सर्वांनी सूर्यनमस्कार करीत व्यायामाचे महत्व पटवून सांगितले. दर रविवारी आरोग्य उपयोगी असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील असे आयोजकांनी सांगितले.ट्रेक नंतर लांडोरखोरी उद्यानासमोरील डॉ.कीर्ती देशमुख यांचे नियोजित फार्महाऊसवर चहा – नाश्ता डॉ. गीतांजली लाठी यांच्या मदतीने आयोजित करण्यात आला होता.